अ‍ॅपशहर

एक्स्प्रेस-वेवर ‘ड्रायव्हर बे’

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरून रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना विश्रांतीसाठी दोन ठिकाणी ‘ड्रायव्हर बे’ उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे डुलकी लागल्याने होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

Maharashtra Times 11 Jun 2016, 4:24 am
रात्रीचे अपघात टाळण्यासाठी चालकांच्या विश्रांतीची सोय करणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम expressway pune mumbai driver bey
एक्स्प्रेस-वेवर ‘ड्रायव्हर बे’

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरून रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना विश्रांतीसाठी दोन ठिकाणी ‘ड्रायव्हर बे’ उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे डुलकी लागल्याने होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे’वर एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान झालेल्या १४० अपघातांचा अहवाल ‘जेपी रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने तयार केला आहे. अहवालातून काही महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या आहेत. एक्स्प्रेस-वेवर गेल्या वर्षात झालेल्या एकूण अपघातांमध्ये २४ टक्के अपघात चालकाला डुलकी लागल्यामुळे झाले होते. रात्री १२ ते सकाळी सहा या कालावधीत ३३ टक्के अपघात झाले आहेत. एकूण अपघातांमध्ये ४० टक्के अपघात ट्रकचे आहेत. या तिन्ही निरीक्षणांमध्ये रात्रीचा प्रवास आणि चालकांना पुरेशी न मिळणारी झोप ही कारणे अधोरेखित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाने चालकांना रात्रीच्या वेळेस किंवा आपतकालीन परिस्थितीत विश्रांतीची व्यवस्था करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक्स्प्रेस -वेवर पुण्याकडून मुंबईकडे जाताना आणि मुंबईकडून पुण्याकडे जाताना जागांची पाहणी करण्यात आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना एक जागा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
..
हॉटेलबंदचा बसतोय फटका
सद्य परिस्थितीत एक्स्प्रेस-वेलगत असलेले हॉटेल रात्री ११ नंतर बंद केली जातात. रात्रीच्या वेळेस घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचा चालकांना त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेस मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. बहुतांश माल वाहतूकदार आंतरराज्य प्रवास करतात. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज असते. रात्री हॉटेल बंद असल्याने त्यांना गाडी उभी करण्याची तसेच, विश्रांतीची संधी मिळत नाही. तसेच, रात्रीच्या वेळेला एक्स्प्रेस वेवर गाड्या उभ्या करणेही धोकादायक आहे. त्यामुळे त्याच अवस्थेत प्रवास करण्याच्या नादात वाहने अपघाताला बळी पडतात. असे प्राथमिक निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वाहनचालकांना ‘ड्रायव्हर बे’चा उपयोग होणार आहे.
------
ड्रायव्हर बेसाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी चालकांना त्यांच्या गाड्या उभ्या करण्याची तसेच, विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता केली जाईल.
राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष, राज्य रस्ते विकास महामंडळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज