अ‍ॅपशहर

कार्तिकी एकादशीसाठी जादा गाड्यांची सोय

कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त आळंदीला जाण्यासाठी १२ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या ११ मार्गांवर बस सोडण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 10 Nov 2017, 4:57 am
आळंदीला जाणाऱ्यांसाठी पीएमपी, एसटीची सेवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम extra pmp st busses for kartiki ekadashi
कार्तिकी एकादशीसाठी जादा गाड्यांची सोय


म. टा. प्रतिनिधी, पुणे

कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त आळंदीला जाण्यासाठी १२ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या ११ मार्गांवर बस सोडण्यात येणार आहेत.
कार्तिकी एकादशीच्या मुख्य दिवशी (१४ नोव्हेंबर) आळंदीची यात्रा आहे, तर १६ नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव आहे. या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने आळंदीला येतात. त्यांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एसटीच्या जादा गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वेस्टेशन बसस्टँड, बारामती, बारामती एमआयडीसी, भोर, मंचर, जून्नर, शिक्रापूर, नारायणगाव, शिरुर, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, देहू येथून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.

‘पीएमपी’च्या १८९ बस
पीएमपीकडून ११ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत १८९ बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये आळंदीच्या मार्गावरील नियमित ६५ बसव्यतिरिक्त १२४ जादा बसचा समावेश आहे. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी येथून आळंदीसाठी बस सोडण्यात येणार आहे. रात्री दहा वाजतानंतर सोडण्यात येणाऱ्या जादा बसला नेहमीच्या तिकिटापेक्षा पाच रुपये जास्त आकारण्यात येणार आहेत. रात्री ११ वाजतानंतर कोणत्याही प्रकारच्या पासचा ग्राह्य धरला जाणार नाही. दरम्यान, या कालावधीत मनपा भवन ते बहूळगाव हा मार्ग संपूर्णपणे बंद राहणार आहे. तर, वाघोली ते आळंदी या मार्गावरील बस मरकळ रस्त्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथून संचलनात राहणार आहेत, असे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज