अ‍ॅपशहर

'त्यांनी वारंवार बलात्कार केला', महिलेला महागात पडली खोटी फिर्याद

पतीने आरोपीकडून घेतलेल्या हातउसन्या पैशांसाठी आरोपीने संबंधित व्यक्तीच्या पत्नीकडे वारंवार तगादा लावला होता. त्या बदल्यात आपल्याकडून शारीरिक संबंधाची सातत्याने मागणी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2020, 8:12 am
म. टा. वृत्तसेवा, भवानीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम खोट्या फिर्यादीप्रकरणीमहिलेस फटकारले


पतीने आरोपीकडून घेतलेल्या हातउसन्या पैशांसाठी आरोपीने संबंधित व्यक्तीच्या पत्नीकडे वारंवार तगादा लावला होता. त्या बदल्यात आपल्याकडून शारीरिक संबंधाची सातत्याने मागणी केली. पैसे न दिल्याने आरोपीने वारंवार बलात्कार केला आणि ७ जून २०२० रोजीही पती घरी नसताना बलात्कार केला, अशी फिर्याद इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस ठाण्यात एका विवाहित महिलेने दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला.

तपासादरम्यान या महिलेने पुन्हा दुसरा जबाब देऊन, आरोपीने बलात्कार केला नसून, फक्त पैशाचा तगादा लावल्याने गुन्हा दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या दरम्यान संशयित आरोपीने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमोर युक्तिवाद करताना संबंधित प्रतिज्ञापत्राचा मुद्दा मांडला व त्यातील विसंगती न्यायालयाच्या नजरेस आणून दिली. पोलिस व न्याय यंत्रणेचा वेळ विनाकारण खर्ची घातल्याबद्दल फिर्यादीवर कारवाईची मागणी केली.

न्यायालयाची चपराक

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून, न्यायाधीशांनी 'फिर्याद खोटी असून, न्यायालय, पोलिस यंत्रणेचा वेळ घालविल्याचे व आरोपीस विनाकारण न्यायासाठी झगडावे लागले,' असे निरीक्षण नोंदवले. वालचंदनगर पोलिस ठाण्यास फिर्यादीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज