अ‍ॅपशहर

रमजानचे उपवास आजपासून सुरू

कर्नाटक, छत्तीसगड, हैदराबाद येथे चंद्रदर्शन झाल्यामुळे त्या आधारावर पुण्यातही आज, गुरुवारपासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे...

Maharashtra Times 17 May 2018, 7:44 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramadan


कर्नाटक, छत्तीसगड, हैदराबाद येथे चंद्रदर्शन झाल्यामुळे त्या आधारावर पुण्यातही आज, गुरुवारपासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. पुण्यातील हिलाल सिरत कमिटीच्या झालेल्या बैठकीत य़ाबाबतचा निर्णय रात्री उशिरा जाहीर करण्यात आला.

पुण्यात हिलाल सिरत कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत मौलाना गुलाम अहमद खान, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन मौलाना कारी उद्रीस, मौलाना एहतेशाम कादरी, मौलाना हाफीज इद्रीस आदी उपस्थित होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये चंद्रदर्शन झाले. मात्र, महाराष्ट्रात मुंबईत चंद्रदर्शन झाले नाही, तर काही शहरांमध्ये चंद्रदर्शन झाल्याची चर्चा होती. त्यामुळे निर्णय घेणे अवघड झाले होते. रात्री उशिरा पुण्यातील मौलानांच्या बैठकीत गुरुवारी रमजानचा पहिला उपवास जाहीर करण्यात आला असून आजपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज