पुणे : जेईई अॅडव्हान्समध्ये पुण्यात अव्वल आलेल्या; तसेच परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 'फिटजी'ने केला. यात पुण्यात पहिला व दुसरा; तसेच देशात २५ व ३३ क्रमांक मिळविणाऱ्या अनुज श्रीवास्तव व अर्जुन कशेट्टीवार यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्याशाखाचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेईई अॅडव्हान्समध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सध्या 'जेईई'साठी तयारी करत असलेल्या इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फिटजीचे पुणे केंद्र प्रमुख श्री. व्ही. हनुमान यांनी कठीण अडचणींपासून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची व अखंड भावनांची प्रशंसा केली. 'जेईई मेन अँड अॅडव्हान्ससाठी फोकस, कष्ट, समर्पण, प्रामाणिकपणा आणि निर्धार आवश्यक आहे. योजना आणि दृढता असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, रचनात्मक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करण्यास मदत करतात,' असे व्ही. हनुमान यांनी सांगितले.
‘फिटजी’तर्फे गुणवंतांचा सत्कार
जेईई अॅडव्हान्समध्ये पुण्यात अव्वल आलेल्या; तसेच परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 'फिटजी'ने केला...
Maharashtra Times 29 Jul 2018, 4:00 am