अ‍ॅपशहर

अभिमानास्पद! एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच, सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस, पाहा व्हिडिओ

Pune News : ज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर एसटी बस चालवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य महिला आयोगानेही या महिलेचे कौतुक केले आहे.

Authored byShrikrishna kolhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2023, 12:52 am
पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालविली. एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचविण्याची जबाबदारी महिलेने शिरावर घेतली. अर्चना अत्राम असे पहिली एसटी बस चालकाचे नाव आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गावर गुरूवारी बस चालविली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a bus was driven by a woman
सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस


सायंकाळी साडेसहा वाजता अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन निघाल्या. त्यांनी आज पहिल्यांदाच चालक म्हणून काम केले.

WTC फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती दयनीय, दोन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड
अत्राम यांनी बस चालविल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्टिवट करून अत्राम यांचे अभिनंदन केले.

चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची... आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.'


WTC Final : येताच दोन चौकार आणि शतकही ठोकले; स्टीव्ह स्मिथने तोडले अनेक विक्रम, विराट कोहलीलाही मागे सारले
पण, याबाबत एसटी महामंडळाकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. एसटी महामंडळामध्ये महिला वाहक म्हणून काम करतात. पण, अद्यापर्यंत महिला चालक एसटी महामंडळात नव्हत्या.

महत्वाचे लेख