नागपूर : हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या शिक्षक तरुणीचा ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. बुधवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती नाजूक असून शरीरातील मुख्य अवयव सुस्थितीत आहेत. दरम्यान, तिच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून चार लाख रुपयांची मदत बँक खात्यात वळती करण्यात आली आहे. तरुणीवर सध्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बुधवारी रुग्णालयाद्वारे पीडितेच्या प्रकृतीसंदर्भात बुलेटिन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तिची प्रकृती अद्याप गंभीर सांगण्यात आली आहे. पण हृदय, फुफ्फुस, मेंदू ही शरीरात जीवनावश्यक अवयव वा मर्मस्थळे चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले आहे. २४वर्षीय पीडितेच्या गळा, छाती, चेहरा, डावा हात, गळा, मानेच्या भागाला भाजल्याच्या जखमा आहेत. त्यामुळे गळ्याच्या आतील अन्ननलिका आणि श्वासनलिकेला आतल्या बाजूने आगीच्या ज्वाळांनी भाजण्याची शक्यता आहे.
पीडितेला चार लाखांची मदत
हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या शिक्षक तरुणीचा ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष सुरू आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2020, 4:00 am