अ‍ॅपशहर

VIDEO | एक-दोन नव्हे, पुण्यातल्या रस्त्यावर चार-चार बिबट्यांचं दर्शन; व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

Pune Leopard Video: दोनच दिवसांपूर्वी एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असताना, आता याच परिसरात चार बिबट्यांचे दर्शन झाले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Contributed by प्रशांत श्रीमंदिलकर | | Edited byअनिश बेंद्रे | Lipi 28 Aug 2023, 12:35 pm

हायलाइट्स:

  • एकाच वेळेला चक्क चार बिबटे निदर्शनास
  • शिरूर तालुक्यातील जांबूत- पिंपरखेड रस्त्यावरील घटना
  • ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
पुणे : शिरूर तालुक्यातील जांबूत- पिंपरखेड रस्त्यावर रात्री एकाच वेळेला चक्क चार बिबटे निदर्शनास आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली असताना, आता याच परिसरात चार बिबट्यांचे दर्शन झाले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने मेंढपाळ, शेतमजूर, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

म्हाडाचं साडेसात कोटींचं घर आवाक्याबाहेर, जालन्यातील भाजप आमदाराचा मोठा निर्णय
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर असल्याचे आपण अनेकदा पाहतो. या ठिकणी बिबट्यांचे दर्शन अनेकदा होत असते. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे बिबट्या निवारा केंद्र आहे. मात्र तरी देखील बिबट्या मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीत येताना पहायला मिळत आहेत.

तक्रारदाराची भारी खेळी, तडजोडीचं नाटक; लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक
शिरूर, आंबेगाव तालुक्यात ऊस लागवडीचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी मोठी जागा आहे. मात्र ऊस तुटून गेल्यानंतर बिबट्या सैरभैर होतात आणि मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवतात.

Kas Pathar : कास पठारावर फुलं कधी बहरणार? पर्यटकांनो प्लॅनिंग सुरु करा, तारखेचा अंदाज व्यक्त
गेल्या दीड ते दोन वर्षापासून पिंपरखेड, जांबूत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे शेत मजूर, शालेय विद्यार्थी, शेतकर्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ घालत असून आतापर्यंत या भागात बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले असून बिबट्यांमुळे पशुधन देखील धोक्यात आले आहे. तरी वन विभागाने या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढवून तांत्रिक पद्धतीने बिबट्यांना जेरबंद करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख