अ‍ॅपशहर

फर्निचरचे गोदाम आगीत भस्मसात

Maharashtra Times 9 Nov 2017, 4:51 am
पुणे : गंज पेठेतील मोमीनपुरा येथे फर्निचरच्या गोदामात लागलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम furniture store vanished in fire
फर्निचरचे गोदाम आगीत भस्मसात

मोमीनपुरा येथे शालिमार फर्निचर्सचे गोदाम आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. फर्निचरने पेट घेतल्याने धूर बाहेर येऊ लागला. धूर दिसू लागल्यानंतर नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. केंद्रप्रमुख साईबाबा जिल्हेवार, जवान शफीक सय्यद, प्रमोद ढसाळ, राजेश घडशी, प्रदीप खेडेकर, सुनील टेंगळे, हनुमंत कोळी यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणल्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज