अ‍ॅपशहर

‘जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास तक्रार करा’

गणेश उत्सवामध्ये कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याची तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे.

Maharashtra Times 31 Aug 2016, 1:17 pm
पुणेः गणेश उत्सवामध्ये कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याची तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh vargani
‘जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास तक्रार करा’


गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करून जबरदस्तीने वर्गणीची मागणी करणाऱ्यांच्या विरोधात नुकताच खडक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, काही वेळा नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते. वर्गणी न दिल्यास मारहाण किंवा इतर पद्धतीने त्रास दिला जातो. त्रास देणारे त्या परिसरातील असल्यामुळे पुन्हा त्यांचा त्रास होण्याच्या भीतीने अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.

याबाबत पाटील यांनी सांगितले, की जबरदस्तीने वर्गणी न मागण्याच्या सूचना मंडळाना देण्यात आल्या आहेत. असे झाल्यास पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाईल. खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील. मात्र, एखाद्यावर पूर्वीचा राग म्हणून तक्रार देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज