पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पित्यासह मुलगी जखमी झाली. संभाजीनगर चौक, आकुर्डी येथे शुक्रवारी (३१ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. प्रेमनाथ नंबियार (वय ५३, रा. वाल्हेकर वाडी रस्ता, चिंचवड) व त्यांची मुलगी मुदरिमा (वय १६) असे जखमी झालेल्या पिता व मुलीचे नाव आहे. या प्रकरणी नंबियार यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकच्या धडकेतवडील, मुलगी जखमी
भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पित्यासह मुलगी जखमी झाली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2020, 4:00 am