अ‍ॅपशहर

राज्यपाल व अजितदादांच्या काही सेकंदांच्या भेटीची जोरदार चर्चा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील आजच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. (Bhagat Singh Koshyari in Pune)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Aug 2020, 10:50 am
पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी दोघांच्या झालेल्या मिनिटभराच्या भेटीचा व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अजित पवार-भगतसिंह कोश्यारी


वाचा: ठाकरे सरकारच्या चिंतेत वाढ; आणखी एका मंत्र्याला करोना

राज्यपाल कोश्यारी हे सकाळी ध्वजारोहणासाठी पोहोचले तेव्हा अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. 'तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या राज्यात आलो आहे' (आपकी परमिशन लिए बगैर आपके राज्य मे आय है...) अशी मिश्किल टिप्पणी राज्यपाल कोश्यारी यांनी केली. त्यावर अजित पवार यांनीही हसून 'अरे ऐसा कुछ नही' असं म्हणत राज्यपालांना प्रतिसाद दिला.

वाचा: 'फडणवीसांचं प्रमोशन हा 'त्या' राजकारणाचा पुरावाच'

भगतसिंह कोश्यारी हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. देशातील राजकारणाचीही त्यांना चांगली जाण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता किती ताकदीचा आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र, प्रभावक्षेत्र कोणतं आहे, याची उत्तम माहिती कोश्यारी यांना असल्याचं आजच्या भेटीत दिसून आलं. पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा दबदबा असल्याचं कोश्यारी यांना चांगलं माहीत आहे. त्याच अनुषंगानं त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केल्याचं बोललं जातं.

पुण्यातील ध्वजारोहण सोहळ्याचा हा व्हिडिओ पुणे विभागीय माहिती कार्यालयानं ट्विटरवर शेअर केला आहे. त्यातच राज्यपाल व अजित पवार यांच्यातील हे काही सेकंदांचं संभाषण ऐकायला मिळत आहे.

वाचा: राष्ट्रवादीमध्ये काहीतरी घडतंय?; बैठकसत्रामुळे चर्चेला उधाण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज