अ‍ॅपशहर

‘जीआरई’विना प्रवेश

विश्वकर्मा विद्यापीठाचे विद्यार्थी आता स्टेट युनिव्हर्सटी ऑफ न्यूयॉर्क, बिंगहॅम्टन येथे जीआरई दिल्याशिवायही पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतील...

Maharashtra Times 13 Dec 2018, 4:00 am

पुणे : विश्वकर्मा विद्यापीठाचे विद्यार्थी आता स्टेट युनिव्हर्सटी ऑफ न्यूयॉर्क, बिंगहॅम्टन येथे जीआरई दिल्याशिवायही पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतील. दोन्ही संस्थांच्या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होईल. अमेरिकेतील बहुतांश उच्च शिक्षण संस्था प्रवेशासाठी जीआरई या परीक्षेचा स्कोअर ग्राह्य धरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीआरई देणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, स्टेट युनिव्हर्सटी ऑफ न्यूयॉर्क, बिंगहॅम्टन आणि विश्वकर्मा ग्रुपमध्ये झालेल्या करारानुसार, विद्यार्थ्यांना स्टेट युनिव्हर्सटी ऑफ न्यूयॉर्क, बिंगहॅम्टनमध्ये जीआरईशिवाय प्रवेश शक्य होणार आहे. बिंगहॅम्टन विद्यापीठाचे अध्यक्ष हार्वे स्टेन्गर यांच्या हस्ते विश्वकर्मा विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नूतन इमारतीचे; तसेच इंडस्ट्री ४.० केंद्राचे उद्घाटनही झाले. विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल, कुलगुरू प्रा. डॉ. सिद्धार्थ जबडे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव गाडे आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज