अ‍ॅपशहर

गुंजन चौकात ‘रास्ता रोको’

गेल्या अनेक महिन्यांपासून मुळा मुठा नदीपात्रालगत असणाऱ्या खराडी शिवणे रस्त्याचे काम रखडले आहे. हे काम रखडल्याने पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढू लागला आहे.

Maharashtra Times 22 Feb 2018, 9:40 am
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gunjan chowk rasta roko
गुंजन चौकात ‘रास्ता रोको’


गेल्या अनेक महिन्यांपासून मुळा मुठा नदीपात्रालगत असणाऱ्या खराडी शिवणे रस्त्याचे काम रखडले आहे. हे काम रखडल्याने पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढू लागला आहे. परिणामी नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खराडी शिवणे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही काळासाठी गुंजन चौकात 'रास्ता रोको' आंदोलन केले.

माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचे अध्यक्ष नारायण गलांडे, नगरसेवक सुनील टिंगरे, रेखा टिंगरे, महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका सुमन पठारे आदी या वेळी उपस्थित होते. माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, 'वडगावशेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी खराडी शिवणे रस्त्याचे काम अडविले आहे. या रस्त्यात त्यांच्या मालकीची काही जागा जात असल्याने त्यांनी रस्त्याला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे स्वार्थासाठी रस्ता अडवणे चुकीचे असून त्यांनी त्वरित आपली जागा महापालिकेच्या ताब्यात द्यावी. खराडी शिवणे रस्ता झाल्यास नगररोड वरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.' नारायण गलांडे म्हणाले, 'विद्यमान आमदाराने मतदारसंघात काहीही विकास कामे केली नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या विकासकामांच्या ठिकाणी स्वतःच्या नावाचे बोर्ड लावून श्रेय घेण्याचे काम करीत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी आमदार जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचे केक कापून वाढदिवस साजरा करीत आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज