अ‍ॅपशहर

मोठी बातमी! मुळशी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, ५०० मीटर जमीन दुभंगली

Pune Earthquake Zone : निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे याचा मानवाला आता मोठा फटका बसताना दिसत आहे. कारण, कुठे पावसाने थैमान घातलं आहे तर काही ठिकाणी आजही उन्हाचा तडाखा आहे. अशात पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये भूकंपाचे हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2022, 8:53 am
पुणे ( मुळशी) : मुळशी तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान होताना पहायला मिळत आहे. तसेच अनेक नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात येत आहे. त्याच मुळशी तालुक्याच्या धरण भागात मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी इथं सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याने तब्बल ५०० मीटर जमीन दुभंगली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम earthquake today pune 2022


मुळशी तालुक्यातील वाघवाडीत माळीणसारखी भूस्खलन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेत नागरिकांच्या स्थळांतराला प्राधान्य दिले जात आहे.

नर्मदा बस दुघर्टनेनं दोन जीवांना केलं वेगळं; लग्न जुळलं, तारीख ठरली पण इंदोरहून घरी परततानाच...
मुळशी धरण भागात असणाऱ्या मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या स्थितीमुळे १२ जुलैपासून साधारणतः पाचशे मीटर लांब भेग पडली आहे. ही भेग पडल्याने टाटा तलावाकडील जमिन एक ते दीड फुटापर्यंत पोहोचली आहे.

मुळशी तालुक्यात जमिन खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनस्थळाची पाहणी केली असून हा भाग टाटा धरणाच्या हद्दीत येत असल्याने तात्पुरती मदत करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

Bus Falls into Narmada River : इंदौरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू
या भागात डोंगरांचे प्रमाण अधिक आहे. तसेच अनेक गावे डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे पावसाळयात असे प्रकार घडत आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी हे काही प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज