अ‍ॅपशहर

संशयास्पद व्यवहारांवर लक्ष

नोटाबंदीनंतरच्या काळात पुणे विभागातील तब्बल २२ हजार व्यक्तींनी संशयास्पद व्यवहार केले आहेत. त्यांची यादीच दिल्लीहून पुण्याला पाठविण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर सहकारी पतसंस्थांवरील सर्वेक्षणामधून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी ठेवी आढळत आहेत. दरम्यान, आतापर्यंत पुणे विभागातून २५० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती शोधण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले आहे.

Maharashtra Times 22 Mar 2017, 3:00 am
Prasad.Panse @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम income tax department eye on account holder
संशयास्पद व्यवहारांवर लक्ष

Tweet : @prasadpanseMT

पुणे : नोटाबंदीनंतरच्या काळात पुणे विभागातील तब्बल २२ हजार व्यक्तींनी संशयास्पद व्यवहार केले आहेत. त्यांची यादीच दिल्लीहून पुण्याला पाठविण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर सहकारी पतसंस्थांवरील सर्वेक्षणामधून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी ठेवी आढळत आहेत. दरम्यान, आतापर्यंत पुणे विभागातून २५० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती शोधण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले आहे.

प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ला ही माहिती दिली. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सर्वांच्याच बँक व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाने नजर ठेवली होती. नोटाबंदीच्या काळात झालेल्या सर्व व्यवहारांचे तपशील प्राप्तिकर विभागाने बँकांकडून मिळवले आहेत. तसेच अन्य काही माध्यमातूनही ही माहिती संकलित करण्यात आली आहे. त्याचे विश्लेषण बेंगळुरू येथील ‘डेटा अॅनॅलिसिस सेंटर’ आणि दिल्लीतील मुख्यालयात सुरू आहे. हा माहितीसाठा प्रचंड मोठा असल्याने त्याच्या विश्लेषणासाठी मोठा कालावधी लागणार आहे. विश्लेषणानंतर संशयास्पद व्यवहार आढळणाऱ्या व्यक्ती किंवा खात्यांची माहिती दिल्ली कार्यालयाकडून संबंधित कार्यालयांना पाठविण्यात येत आहे.

‘नोटाबंदीच्या काळात पुणे विभागातून संशयास्पद व्यवहार झालेल्या खात्यांची यादी दिल्लीहून पुणे कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. पुणे विभागात नागपूर व मुंबई विभाग सोडून राज्यातले सर्व अन्य जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये तब्बल २२ हजार व्यक्तींचा समावेश आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

पतसंस्थांवरही करडी नजर

राज्यभरातील सहकारी पतसंस्थाही प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. पुणे विभागातील १५ हून अधिक पतसंस्थांवर सर्व्हे करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातील काही मल्टिस्टेट, नागरी व बिगरशेती पतसंस्थांचा समावेश आहे. एका मल्टिस्टेट पतसंस्थेच्या संचालकांकडे आठ कोटी रुपयांच्या ठेवी बेहिशेबी असल्याचे आढळले आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज