अ‍ॅपशहर

‘भारतीय राज्यघटना ही खरी भगवद्गीता’

भारतीय राज्यघटना ही खरी भगवद्‍गीता आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचे मुलभूत हक्क व कर्तव्ये आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे प्रत्येक नागरिकाने पालन केले पाहिजे,’ असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.

Maharashtra Times 26 Mar 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian constitution is real bhagwat geeta said mp anil shirole
‘भारतीय राज्यघटना ही खरी भगवद्गीता’

भारतीय राज्यघटना ही खरी भगवद्‍गीता आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचे मुलभूत हक्क व कर्तव्ये आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे प्रत्येक नागरिकाने पालन केले पाहिजे,’ असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्र प्रदर्शनाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

नेहरू युवा केंद्र, पुणे व आर्य नागार्जुन संग्रहालयातर्फे बालगंधर्व कला दालनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त तीन दिवसीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन तळेगाव येथील सीआरपीएफचे पोलिस उपमहासंचालक आर. टी. परमहंस यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा इतिहास नोंदविणारी छायाचित्रे आणि वस्तूंचे संग्राहक दिलीप वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, नगरसेविका लता राजगुरू, दूरदर्शनचे माजी संचालक भगवान इंगळे, सुखदेव कोचे आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात आंबेडकर यांची छायाचित्रे, माहिती, तसेच त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. २५, २६ आणि २७ मार्च असे तीन दिवस हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले आहे, अशी माहिती संग्राहक दिलीप वानखेडे यांनी दिली. ‘नेहरू युवा केंद्राने देशातील १२५ जिल्ह्यांत आंबेडकर यांचे विचार पोहचवण्यासाठी समता रॅली, क्रीडा स्पर्धा अशा ३४५ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,’ असे मानखेडकर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज