म. टा. प्रतिनिधी, पुणे
दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेल्या महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सुरू झाले असून आज (रविवारी) सायंकाळपर्यंत ते पूर्ण होणार आहे.
ही नादुरुस्त वीजवाहिनीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील व आसपासच्या नागरिकांना पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र, भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने सोमवार पेठ पोलिस लाइन (समर्थ पोलीस ठाण्यामागील परिसर), अपोलो टाॅकीजचा परिसर, अग्यारी, पासोड्या विठोबा मंदिर परिसर या तीन ११ केव्ही वीजवाहिन्यांवर शनिवारी प्रत्येकी एक तासाचे भारनियमन करण्यात आले. जेसीबीने तोडलेल्या ‘महापारेषण’च्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ कर्मचारी काल पुण्यात दाखल झाले आहेत. या वीजवाहिनीची चार ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे दिसून आले. त्यानुसार दुरुस्तीकामाला सुरुवात झाली असून आज सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याचे ‘महापारेषण’कडून सांगण्यात आले. सध्या ‘महावितरण’कडून शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसराला पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ८० मेगावाॅट विजेचे भारव्यवस्थापन करण्यात येत आहे. परंतु विजेची मागणी वाढल्यास व भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास नाइलाजाने काही भागांत चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.