अ‍ॅपशहर

'फडणवीसांना आम्ही कधीही 'टरबुज्या' म्हटलेलं नाही'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर तीव्र पडसाद उमटताच...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2020, 5:25 pm
पुणे: देवेंद्र फडणवीस यांना कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं टरबुज्या म्हटलेलं नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यामुळं त्यांनी राग मानून घेऊ नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जयंत पाटील पुण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadanavis


राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या; तर मला चंपा म्हणतात. हे कसे चालते,' असा आरोप पाटील यांनी केला होता. या आरोपांवर उत्तर देताना जयंत पाटील यांनी पक्षाकडून स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसनं कधीही टरबुज्या म्हटलं नाही. द्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यामुळं त्यांनी राग मानू नये. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस कधीही समर्थन देत नाही, असं स्पष्टी केलं आहे. तसंच, शरद पवारांनी आम्हाला कधी अशा गोष्टी शिकवल्या नाहीत, असा टोलाही जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे.

'तुम्ही फडणवीसांना 'टरबुज्या', मला 'चंपा' म्हणता ते कसे चालते?'

'पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या. त्यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल क्रमांक, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती,' जयंत पाटील यांनी केला आहे.

एनसीबी अधिकाऱ्यांवर हल्ला; भाजपनं उपस्थित केले 'हे' प्रश्न

'राज्य सरकारवर ६७ हजार कोटींची थकबाकी आहे. या अवस्थेत सरकार वीजेसंदर्भात दुरुस्तीची कामे करणार आहेत. आपणी व्यवस्था टिकणे महत्त्वाची आहे. आम्ही वीज बिलासंदर्भात मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. पण मागील सरकारने काम केले असते तर ही वेळ आली नसती,' असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण, देवेंद्र फडणवीस म्हणतात...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज