अ‍ॅपशहर

‘बालगंधर्व’ला येणार छावणीचे स्वरूप

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्रसंघाचे अध्यक्ष कन्हैयाकुमार यांच्या आज, रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी एक वाजता होणाऱ्या सभेला पोलिसांकडून चोख बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. कन्हैयाकुमार यांचे रविवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून सभेच्या ठिकाणापर्यंत येईपर्यंत त्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच पुरविण्यात येणार आहे, अशी मा​हिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली.

Maharashtra Times 24 Apr 2016, 4:13 am
कन्हैयाच्या आजच्या सभेसाठी चोख पोलिस बंदोबस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kanhaiyykumar pune lecture balgandharv
‘बालगंधर्व’ला येणार छावणीचे स्वरूप


म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्रसंघाचे अध्यक्ष कन्हैयाकुमार यांच्या आज, रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी एक वाजता होणाऱ्या सभेला पोलिसांकडून चोख बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. कन्हैयाकुमार यांचे रविवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून सभेच्या ठिकाणापर्यंत येईपर्यंत त्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच पुरविण्यात येणार आहे, अशी मा​हिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली.

पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीने कन्हैयाकुमार यांची सभा पर्वती पायथ्याजवळील साने गुरुजी स्मारक येथे सभा आयोजित केली होती. मात्र, सभेसाठी हे ठिकाण योग्य नसल्याचे पोलिसांकडून आयोजकांना सांगण्यात आले. याच ठिकाणी सभा घ्यावयाची असल्यास आयोजकांना काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सभेचे ठिकाण बदलून बालगंधर्व रंगमंदिर करण्यात आले आहे. रंगमंदिरात ९९०ची आसनक्षमता आहे. रंगमंदिरातील व्यासपीठावर वीस जण असणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्या सभेला पोलिसांनी यापूर्वी कधीही परवानगी नाकारली नव्हती. आयोजकांचा अर्ज न आल्यामुळे त्यांना परवानगी देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नव्हता. त्यानंतर आयोजकांनी सभेच्या परवानगीसाठी अर्ज केला असून तो पोलिसांनी मंजूर करून सभेला परवानगी दिली आहे.
..
असा असेल पोलिस बंदोबस्त
सभा चालू असताना अथवा त्यापूर्वी सभेच्या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणुन बंदोबस्तासाठी एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १२० पुरुष कर्मचारी, दहा महिला कर्मचारी, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकडया आणि वज्र तैनात करण्यात आले आहे, असे वाकडे यांनी सांगितले. विमानतळावरून सभेच्या ठिकाणापर्यंत पोहचेपर्यंत कन्हैयाची गाडी अडवणे, अडथळा निर्माण करणे, दगडफेक अथवा काळे फासणे असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी विमानतळ, येरवडा, कोरेगांव पार्क, बंडगार्डन, फरासखाना, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर ११० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
-------------
कन्हैयाला नोटीस बजावणार
या सभेला चौदा संघटनांनी पाठिंबा असल्याची माहिती पोलिसांकडे उपलब्ध झाली असून, सभेला पाच ते सहा संघटनांनी विरोध दर्शविला आहे. विरोध दर्शविणाऱ्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिसा दिल्या आहेत. तर कन्हैयाने देशविरोधी आणि धार्मिक भावना भडकतील, असे आक्षेपार्ह वक्तव्य करू नये म्हणून ‘सीआरपीसी १४४’ प्रमाणे नोटीस दिली आहे. विमानतळावर आगमन झाल्यानंतर ही नोटीस कन्हैयाला देण्यात येणार आहे.
..
एफटीआयआय, फर्ग्युसन कॉलेजला भेट नाही
कन्हैयाकुमार बालगंधर्व रंग​मंदिर येथे सभा घेणार असले तरी, ते एफटीआयआय आणि फर्ग्युसन कॉलेजला भेट देणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या सभेमुळे बालगंधर्व रंगमंदिर आणि परिसरात मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ओळखपत्र असणाऱ्यांनाच सभेला प्रवेश देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज