म. टा. प्रतिनिधी, पुणे
निविदा प्रक्रियेतील गोंधळामुळे रुंदीकरण रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर आणखी एका दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू झाला. हुसेन कासिम मोमीन (वय २२, रा. कोंढवा खुर्द) याचा मृत्यू झाला. ट्रकचालक दत्ता दशरथ खताळ (वय २८, रा. माण, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
हा अपघात रविवारी रात्री साडेअकरा वाजता झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक खताळ वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत, भरधाव वेगात ट्रक चालवित होता. त्याच्या ट्रकची हुसेनच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात हुसेन गंभीर जखमी होऊन मरण पावला.
……………..............