अ‍ॅपशहर

खडकवासला, धामणी, कवडास तुडुंब

गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळं तुडुंब भरलेल्या पुण्यातील खडकवासला धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. त्यामुळं पुणे मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आहे. दुसरीकडं, पावसानं सर्वाधिक झोडपलेल्या पालघर जिल्ह्यातील धामणी व कवडास धरणाचेही प्रत्येकी पाच दरवाजे उघडण्यात आले असून सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

महाराष्ट्र टाइम्स 16 Jul 2018, 1:20 pm
पुणे/पालघर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kavdas and dhamni dhamni dam overflow
खडकवासला, धामणी, कवडास तुडुंब


गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळं तुडुंब भरलेल्या पुण्यातील खडकवासला धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. त्यामुळं पुणे मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आहे. दुसरीकडं, पावसानं सर्वाधिक झोडपलेल्या पालघर जिल्ह्यातील धामणी व कवडास धरणाचेही प्रत्येकी पाच दरवाजे उघडण्यात आले असून सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

खडकवासला धरणातून १७१२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं आहे. त्यामुळं जिमखाना आणि संभाजी उद्यानाच्या मागील बाजूस सुरू असलेले मेट्रोचे काम थांबविण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग थांबल्यानंतरच काम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील सिंचनासाठी बंधलेल्या सूर्या प्रकल्पातील कवडास व धामणी धरण पूर्ण भरून वाहू लागल्यानं या धरणाचे दरवाजे सकाळी साडे अकरा वाजता उघडण्यात आले. धामणीचे ५ दरवाजे ३ फुटांपर्यंत उघडण्यात आलेत. त्यातून प्रति सेकंद ९९०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कवडास धरणातून सेकंदाला तीस हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग होत आहे. मात्र, येथील परिस्थिति नियंत्रणात असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज