अ‍ॅपशहर

पुणे जिल्ह्यात शाळेतून १४ वर्षीय मुलाला पळवलं; घटनेनं परिसरात खळबळ

Pune News Today : मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2022, 6:12 pm
पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शासकीय निवासी आश्रम शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक जिल्ह्यातून पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. मात्र आज पेठ येथील शासकीय निवासी शाळेतून एका १४ वर्षीय पळून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र वैजनाथ उघडे असं पळवून नेलेल्या मुलाचं नाव आहे. मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune school news
पुण्यातील शाळेतून अपहरण


शासकीय निवासी शाळेचा सर्व खर्च शासनाकडून केला जातो. यामध्ये ज्या पालकांच्या घरची परिस्थिती बेताची असते, अशा मुलांना पालक या शाळेत आणून सोडतात. आंबेगाव तालुक्यात साधारण ५ ते ६ निवासी शाळा असून एका शाळेत साधारण १०० ते १५० च्या आसपास विद्यार्थी आहेत. अशाच एका निवासी शाळेतून महेंद्र उघडे याला पळवून नेल्याची माहिती समोर येताच मुख्याध्यापकांनी मंचर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत आणखी एक मोठी अपडेट; राज्याच्या महाधिवक्त्यांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

दरम्यान, निवासी शाळांमधून मुलांना पळवून नेण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे निवासी शाळेत मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पालकांमधून संताप व्यक्त होत असून आमच्या मुलांची सुरक्षितता करता येत नसेल तर आम्ही आमच्या मुलांना या शाळेत ठेवायचं कसं, असा संतप्त सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज