अ‍ॅपशहर

किडनीवरील उपचारासाठी तो जेलमध्ये जातो!

गुन्हा केल्यानंतर अटक होऊ नये म्हणून गुन्हेगार पळून जातात. परंतु एक गुन्हेगार स्वतःच्या आजारपणावर उपचार व्हावेत, म्हणून फेक फॉल करून स्वतःला अटक करून घेतो. जामीन न घेता जेलमध्ये राहतो,' अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय ३०, नवीपेठ, पुणे) असं या आरोपीचं नाव आहे.

Maharashtra Times 4 Dec 2017, 1:41 pm
पुणे: गुन्हा केल्यानंतर अटक होऊ नये म्हणून गुन्हेगार पळून जातात. परंतु एक गुन्हेगार स्वतःच्या आजारपणावर उपचार व्हावेत, म्हणून फेक फॉल करून स्वतःला अटक करून घेतो. जामीन न घेता जेलमध्ये राहतो,' अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय ३०, नवीपेठ, पुणे) असं या आरोपीचं नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kopardi case pune police arrested man who makes fake call
किडनीवरील उपचारासाठी तो जेलमध्ये जातो!


मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावे फोन करून कोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात ठेवा, असा फोन केल्याप्रकरणी पोलिसांनी कांबळेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कांबळे यानं गुन्हेगारी कारवाया करण्यामागचा हेतू सांगितला. अमित कांबळे हा गेल्या चार वर्षांपासून किडनीच्या विकारानं त्रस्त आहे. आजारावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. परंतु, गुन्हा केल्यानंतर जेलमध्ये राहता येते. आजारपणावर सरकारी खर्चानं उपचार होतात, हे माहीत असल्यानं फेक कॉल करून तो स्वतःला अटक करवून घेतो, अशी माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

कांबळेवर पुण्यात अनेक गुन्हे

पुण्यातील डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, हडपसर या पोलीस ठाण्यात कांबळेच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. किडनीतज्ज्ञ असल्याचं सांगून रुग्णांची लूटमार करणे, निनावी फोन करून धमक्या देणे असे गुन्हे त्याच्यावर आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज