परभणी : राज्यातील २७ महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या पुढील आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहावा मजला मंत्रालय मुंबई येथे बुधवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता आयेाजित केली आहे. यात परभणी शहर महापालिकेच्या महापौरपदाची देखील सोडतीद्वारे आरक्षण निश्चित होणार आहे. तरी सदर सोडतीच्या वेळी महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांनीही या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन अव्वर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे व परभणी मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.
परभणीच्या महापौर पदाची उद्या सोडत
राज्यातील २७ महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या पुढील आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहावा मजला मंत्रालय मुंबई येथे ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 4:00 am