पुणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत येत्या शनिवारी (८ फेब्रुवारी) राष्ट्रीय 'लोकअदालती'चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या आणि दाखलपूर्व असलेल्या तडजोडयोग्य दावे निकाली काढण्यासाठी या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. न्यायालयात तडजोडयोग्य असलेले दहा हजारांपेक्षा जास्त प्रलंबित दावे; तसेच ३० हजारांपेक्षा जास्त दाखलपूर्व केस निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. न्यायालयातील कामकाजाबाबत कोणतीही अडचण आल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव चेतन भागवत यांनी केले.
लोकअदालत शनिवारी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत येत्या शनिवारी (८ फेब्रुवारी) राष्ट्रीय 'लोकअदालती'चे आयोजन करण्यात आले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2020, 4:00 am