अ‍ॅपशहर

पुण्यातील ७४, कोल्हापुरातील ४० विद्यार्थी कोटातून परतले

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळं राजस्थानातील कोटा येथे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी तिथे अडकले होते. त्यांना परत आणण्यात येत आहे. आज पुण्यातील ७४ आणि कोल्हापुरातील ४० जण सुखरूप घरी परतले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2020, 3:58 pm
पुणे/ कोल्हापूर: लॉकडाऊनमुळं राजस्थानातील कोटा येथे अडकलेले पुणे आणि कोल्हापुरातील शंभराहून अधिक विद्यार्थी आज आपल्या स्वगृही सुखरूप परतले. पुण्यातील विद्यार्थ्यांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची एका वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus students
कोटा येथे अडकलेले पुण्यातील विद्यार्थी स्वारगेट बसस्थानकात उतरले.


लॉकडाऊनमुळं महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या बस कोटा येथे पाठवल्या होत्या. या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, कोल्हापूरसह विविध भागांतील विद्यार्थी होते. पुणे आणि कोल्हापुरातील विद्यार्थी आज सुखरूप आपल्या घरी पोहोचले आहेत. पुण्यातील विद्यार्थी आज, पहाटे स्वारगेट बसस्थानकात सुखरूप उतरले. येथे आल्यानंतर ७४ विद्यार्थी आणि ८ बसचालकांची पुणे महापालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कुणालाही करोना सदृश्य लक्षणं आढळून आली नाहीत. त्यामुळं त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन शिक्का मारून त्यांना पालकांच्या स्वाधीन केलं.

१४ दिवसांत त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना पुण्यात सोडल्यानंतर चारही बस निर्जंतुकीकरण करून धुळ्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

४० विद्यार्थी कोल्हापुरात परतले

राजस्थानातील कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले कोल्हापुरातील ४० विद्यार्थी शनिवारी कोल्हापुरात पोहोचले. जेईइी, नीट, जेईई अॅडव्हान्स या परीक्षांच्या तयारीसाठी हे विद्यार्थी कोटा येथे होते. यामध्ये ३१ विद्यार्थी आणि ९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्य सरकारने त्यांच्यासाठी महामंडळाच्या बसची व्यवस्था केली होती. १२०० किलोमीटरचे अंतर, ३६ तास प्रवास करुन हे विद्यार्थी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज येथील वसतिगृहात त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

सर्व विमाने १७ मेपर्यंत बंदच; आदेश जारी

पालघर मॉब लिंचिंग: कोठडीतील आरोपीला करोना

नाशिकमधून दुसरी गाडी सुटली; ८४५ मजूर यूपीच्या दिशेनं

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज