अ‍ॅपशहर

राज्यमंत्री कांबळे यांनी केले घूमजाव

‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?... मी दलित आहे... एकेकाचं थोबाड रंगवलं असतं...’ हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सोमवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ते मागे घेतले. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टिकरण त्यांनी दिले.

Maharashtra Times 14 Mar 2017, 6:29 am
वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने वादग्रस्त विधान मागे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra minister dilip kamble apologises over remarks disparaging brahmins
राज्यमंत्री कांबळे यांनी केले घूमजाव


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?... मी दलित आहे... एकेकाचं थोबाड रंगवलं असतं...’ हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सोमवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ते मागे घेतले. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टिकरण त्यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त विधानाची धग कुठे शमते नाही तेच, राज्यमंत्री कांबळे यांचे लातूर येथील वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने सरकारच्या बदनामीसाठी आंदोलन केली जात असल्याची टीका करताना त्यांनी थेट जातीचाच आधार घेतला.

भाषणात जोरदार टोलेबाजी करताना त्यांनी ‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का? मी दलित आहे. एकेकाचं थोबाड रंगवलं असतं,’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासमोरच हे सर्व घडले. त्यांनी ‘होळी असल्याने मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये,’ अशी सारवासारवही केली.

कांबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने निषेध केला. ‘शूरवीर ब्राह्मण वीरांचा इतिहास कांबळे विसरलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आता पुण्याच्या महापौर या ब्राह्मण झाल्यामुळे कांबळे यांना झालेली पोटदुखी या निमित्ताने बाहेर पडली आहे. कांबळे यांच्या गणेश कला क्रीडा मंदिराशेजारी असलेल्या कार्यालयाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे,’ असे महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज