भोर, पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा नुकताच भोर तालुक्याचा दौरा पार पडला. सुप्रिया सुळे या नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या फोटो, व्हिडिओंच्या माध्यमातून त्या सोशल मीडियावर आठवणी शेअर करत असतात. त्यांनी सांगितलेला असाच एक किस्सा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. भोर गावातील जानबा पारठे हे खास सुप्रिया सुळे यांच्यासाठी अळू वडीचा डबा घेऊन आले होते. जनाबा पारठे हे शरद पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. सुप्रिया सुळेंना आणलेला डबा हा त्यांच्यासाठी आशीर्वाद असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
जानबांचं हे प्रेम पाहून सुप्रिया सुळेंना खूप आनंद झाला. यापेक्षा दुसरा अशीर्वाद काय असू शकतो? या आशयाची पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हे नाते आपुलकीचे आहे. भोर तालुक्यातील आपटी या गावचे जानबा पारठे हे आदरणीय पवार साहेबांचे जुने सहकारी आहेत. मी जेव्हा त्या मार्गावरुन जाते तेव्हा हे काका माझी वाट पाहत थांबलेले असतात. ते माझी विचारपूस करतात आणि अतिशय प्रेमाने अळूची वडी व भाकरीचा डबा देतात. ही साधी पण आपुलकी व प्रेमाने ओथंबलेली भेट.."
"आवर्जून नमूद करायची बाब म्हणजे ते साहेबांना देखील असाच डबा देतात. अगदी मध्यंतरी ते दिल्लीला जाऊन आले तेव्हा त्यांनी साहेबांसाठी खास हा डबा बांधून आणला होता. ही प्रेमळ भेट तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठा तो आशीर्वाद देखील आहे. या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद." या आशयाचा मजकूर त्यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे.