अ‍ॅपशहर

दहावीचा निकाल ८८.७४ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८८.७४ टक्के लागला असून मुलींनी यंदाही बाजी मारली आहे.

Maharashtra Times 13 Jun 2017, 12:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra ssc board result declared
दहावीचा निकाल ८८.७४ टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८८.७४ टक्के लागला असून यंदाही 'कोकण-कन्या' एक्सप्रेस सुस्साट धावली आहे.

यावर्षी दहावीच्या परीक्षेला १६,४४,०१६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४,५८,८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल ०.८२ टक्के कमी लागलाय.

२४ जूनला दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळणार असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे.

विभागनिहाय निकाल असाः

मुंबईः ९०.०९ टक्के
कोकणः ९६.१८ टक्के
पुणेः ९१.९५ टक्के
नाशिकः ८७.७६ टक्के
नागपूरः ८३.६७ टक्के
कोल्हापूरः ९३.५९ टक्के
अमरावतीः ८४.३५ टक्के
औरंगाबादः ८८.१५ टक्के
लातूरः ८५.२२ टक्के

उत्तीर्ण मुलं - ८६.५१ टक्के
उत्तीर्ण मुली - ९१.४६ टक्के


विद्यार्थ्यांना आपला संपूर्ण निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. www.maharesult.nic.in या लिंकवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहेच, पण 'नो यूवर रिझल्ट'च्या खालील बॉक्समध्ये आवश्यक माहिती भरूनही विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज