मंगळसूत्र हिसकावले
सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले वाकड येथील काळाखडक परिसरात ही घटना घडली...
पिंपरी: सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. वाकड येथील काळाखडक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पार्वती नामदेव पवार (वय ५७, रा. मुंजाबानगर, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मोटार सायकलवरील दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. वाकड येथील काळाखडक रस्त्यावरून चालत असताना पाठीमागून मोटारसायकलीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.
०००००