अ‍ॅपशहर

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 30 Aug 2016, 1:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi author v g kanitkar passes away
ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'नाझी भस्मासुराचा उदयास्त' या गाजलेल्या पुस्तकाच्या अनुवादामुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती. ' व्हिएतनाम : अर्थ आणि अनर्थ, फाळणी टाळणारा महापुरुष : अब्राहम लिंकन, धर्म: म. गांधींचा व स्वा. सावरकरांचा, फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख, इस्रायल: युद्ध, युद्ध आणि युद्धच, माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र, महाभारताचा इतिहास, होरपळ ही त्यांची पुस्तकेही गाजली. 'स्वाक्षरी' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज