अ‍ॅपशहर

नेते व्यासपीठावर, साहित्यिक खाली

बडोदा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाषा मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार का, याबाबत संभ्रम कायम आहे.

Maharashtra Times 16 Feb 2018, 12:56 pm
Chintamani.Patki@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi sahitya sammelan leaders on the stage authors dawn
नेते व्यासपीठावर, साहित्यिक खाली


Tweet: ChintamanipMT

बडोदा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाषा मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. दोन राज्यांचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे राज्यपाल उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले तर साहित्यिक, साहित्य महामंडळ आणि आयोजक यांच्या केवळ सातजणांना व्यासपीठावर बसता येईल असा आदेश स्थानिक पोलिस प्रशासनाने दिल्याने साहित्यिक आणि वाड्मयीन कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसेच गुजरातचे राज्यपाल उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असतील तर सुरक्षा आणि राज्यशिष्टाचारामुळे साहित्यिक आणि साहित्य महामंडळाचा सुमारे २१ जणांपैकी केवळ सात जणांना व्यासपीठावर बसता येईल. उर्वरित मंडळींना खाली बसावे लागेल, असा आदेश स्थानिक पोलिस प्रशासनाने आयोजकांना दिल्याने वाड्मयीन कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. व्यासपीठावर साहित्यिक, कार्यकर्ते का नको असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुरुवारी झालेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत तक्रारीचा पाढा वाचण्यात आला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाषा मंत्री विनोद तावडे यांचा बडोदा दौर अजूनही अनिश्चित असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री आणि भाषा मंत्री यांना संमेलनाचे निमंत्रण मिळाले नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी मंत्रालय आणि भाषा विभागाकडून साहित्य महामंडळाला विचारणा झाली होती. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जोशी यांनी बडोदाच्या मराठी वाड्मय परिषद या आयोजकांची ईमेलद्वारे कान उघाडणी केली होती. मुख्यमंत्री आणि भाषामंत्री यांना कोणी निमंत्रण दिले होते, त्याबाबत फाॅलोअप घेतला का , अशी विचारणा जोशींनी केली होती.

याबाबत जोशींना विचारले असता, ते म्हणाले मुख्यमंत्री आणि भाषा मंत्री यांना रितसर निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ते येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवारी होणार्या सयाजीराव गायकवाड यांच्यावरील खंडाच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील की नाही याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. सायंकाळपर्यंत याबाबतीत संभ्रम होता.

दरम्यान याबाबत मटाने तावडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर ते संमेलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाषामंत्री यांना निमंत्रण पत्रिका पाठवल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सांगितले.

एकीकडे हा संभ्रम कायम असताना स्थानिक पोलिसांनी दोन राज्यांचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे राज्यपाल उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले तर साहित्यिक, साहित्य महामंडळ आणि आयोजक यांच्या केवळ सातजणांना व्यासपीठावर बसता येईल असा आदेश दिल्याने अस्वस्थता पसरली आहे. दुर्गाबाई भागवत संमेलनाध्यक्ष असताना त्यांनी साहित्यिकांना व्यासपीठावर तर राजकीय मंडळींना व्यासपीठासमोर बसण्यास भाग पाडल्याची आठवण यानिमित्त जागवली जात आहे.

महामंडळाने खर्च करावा

साहित्य महामंडळाच्या महाकोश निधीवरून महामंडळाच्या बैठकीमध्ये सदस्यांनी पदाधिकार्यांना धारेवर धरले. महाकोशात १ कोटी ४० लाख रुपये असताना त्याचा उपयोूका केला जात नाही आणि या रकमेमुळे कर भरावा लागतो त्याचे काय, अशी विचारणा करण्यात आली. संमेलनाचा खर्च वरच्यावर भागविण्यापेक्षा हा निधी वाढवावा आणि महामंडळाने आर्थिक मुद्द्यावरून हात वर करण्यापेक्षा कृतिशील सहभाग नोंदवावा, अशी टिप्पणी सदस्यांनी केली.

बडोदानगरी सज्ज

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यास्वागतासाठी बडोदानगरी सज्ज झाली आहे.देशभरातून साहित्यिक, प्रकाशक, रसिक, संमेलनस्थळी दाखल झाले असून, मुख्य मंडप, ग्रंथदालन व उपमांडव व अन्य सर्व व्यवस्था पूर्णझाली आहे. महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या परिसरात हेसंमेलन पार पडत असून, मुख्य सभा मंडपालामहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी असेनाव देण्यात आले आहे. तसेच पुण्यश्लोक महाराजा रणजितसिंग गायकवाड व चं. चि. महेता अशी उप सभामंडपाला नावे देण्यात आली आहेत. तर ग्रंथ प्रदर्शनाला पु. आ. चित्रे यांचे नाव देण्यात आले आहे. मुख्य सभा मांडवात दहा हजार रसिक बसू शकतील एवढी आसन क्षमता आहे. साहित्यिक मंडळींसह महामंडळाचे सर्व पदाधिकारी घटक संस्था, संलग्न संस्था आणि समावेश संस्थेचे पदाधिकारी बडोद्यात दाखल झाले आहेत. बडोद्यात ठिकठिकाणी साहित्यिकांचे स्वागत करणा-या कमानी उभारण्यात आल्या आहेत. महत्वाच्या चौकात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. विद्यापीठ परिसरात विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी करण्यात आल्या आहेत. देशभरातून येणा-या साहित्यिक, रसिकांसाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. विद्यापीठातील विविध रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज