अ‍ॅपशहर

अठ्ठावीस वर्षांनंतर मनोरुग्ण घरी परतला

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झालेला मनोरुग्ण तब्बल २८ वर्षानंतर घरी परतला.

Maharashtra Times 3 Aug 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, येरवडा येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झालेला मनोरुग्ण तब्बल २८ वर्षानंतर घरी परतला. घरी घेऊन जाण्यास आधी नकार देणाऱ्या कुटुंबाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी समुपदेशन केल्यानंतर पूर्णपणे बरा झालेल्या मनोरुग्णाला घरी नेण्यात आले. अनेक वर्षांनी घरी जात असल्याने या रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mentally disabled went home from hospital after 28 years
अठ्ठावीस वर्षांनंतर मनोरुग्ण घरी परतला


पंकज निकम (नाव बदलले आहे, रा. नांदेड) या मनोरुग्णाला १७ फेब्रुवारी १९८८मध्ये कोर्टाच्या आदेशाने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. एकदा रुग्णाला उपचारांसाठी दाखल केल्यास त्याला पुन्हा घरी घेऊन नातेवाईक टाळाटाळ करतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बरे झालेले रुग्ण घरी जाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, नातेवाईक रुग्णांना घरी घेऊन जाण्यास उत्सुक नसल्याने मनोरुग्णालयच त्यांचे घर बनले आहे.

येरवडा मनोरुग्णालयात काही वर्षे उपचार झाल्यावर पंकज बरा झाला. पण, कुठे राहतो हे त्याला सांगता येत नव्हते. सामाजिक कार्यकर्ते किरण कोरे यांनी पंकजशी सतत संवाद साधून त्याला बोलते केले. काही दिवसानंतर पंकजने आपण नांदेड जिल्ह्यातील हारनळा गावचा रहिवाशी असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंकजच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. पण कुटुंबीयांनी सुरुवातीला पंकजला स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, कोरे यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला. पंकज पूर्णपणे बरा झाला असून त्याला तुमची खूप गरज आहे. औषधोपचार आणि नातेवाईकांचा सहवास लाभल्यास तो आणखी बरा होईल, असे पटवून दिल्यानंतर पंकजचे कुटुंबीय त्याला मनोरुग्णालयातून घरी घेऊन गेले. प्रभारी अधीक्षक डॉ. मधुमिता बहाले, वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. घोरपडे, डॉ. इंगळे, परिचारिका साळी, संजेवड आणि देशमुख यांनी मोलाची मदत केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज