अ‍ॅपशहर

Pune : वनाझ ते गरवारे दरम्यान चाचण्यांसाठी मेट्रो बंद; 'या' मार्गावरील प्रवासी सेवेत बदल नाही

दुपारी दोननंतर सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या मार्गिकेवरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नाही.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 27 Dec 2022, 11:21 am
पुणे : कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीएस) या सिग्नलिंग प्रणालीच्या चाचण्यांसाठी वनाझ ते गरवारे कॉलेज दरम्यान आज, मंगळवारी (२७ डिसेंबर) आणि बुधवारी (२८ डिसेंबर) सकाळी आठ ते दुपारी दोनदरम्यान मेट्रो सेवा पूर्ण बंद राहणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या मार्गावरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नसल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune metro1
वनाझ ते गरवारे दरम्यान चाचण्यांसाठी मेट्रो बंद; 'या' मार्गावरील प्रवासी सेवेत बदल नाही


वनाझ ते गरवारे कॉलेज मर्गावर सिग्नलिंगच्या दृष्टीने काही आवश्यक चाचण्या घेण्याचे नियोजन ‘महामेट्रो’ने केले आहे. या चाचण्या २७ व २८ डिसेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन या दरम्यान घेतला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवा सकाळी आठ ते दुपारी दोनदरम्यान बंद राहणार आहे. दुपारी दोननंतर सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या मार्गिकेवरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नाही. या मार्गावरील प्रवासी सेवा सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत नेहमीप्रमाणे सुरू राहील.

महत्वाचे लेख