अ‍ॅपशहर

निवेदन देऊन झाले पण फायदा नाही, मग महापालिकेला थेट 'बबन्या' भेट दिला

Pune News: पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावर निवेदन देऊन देखील उपाययोजना न करणाऱ्या मनपाला मनसेने घोडा भेट दिला.

| Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2022, 6:27 pm
पुणे : पुण्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यातले रस्ते मोठ्या प्रमाणात तुंबले होते. त्याचप्रमाणे पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पुण्यातील ड्रेनेज लाईन देखील तुंबलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र महापालिकेकडून अजून पर्यंत कोणतीही उपाययोजना यावर केली गेली नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gifted horse


आज पासून दिवाळी सुरू होत आहे. नागरिकांच्या घरासमोर ड्रेनेजचे पाणी साचला आहे. अशात नागरिकांनी त्या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये रांगोळी काढायची का ? असा सवाल मनसेने केला आहे. तर कासव गतीने कामकाज करणाऱ्या महापालिकेला घोड्याची गती प्राप्त व्हावी म्हणून मनसेने आगळवेगळ आंदोलन करत महापालिकेला थेट घोडाच भेट दिला आहे.

वाचा- सुपर-१२ मधील सर्व संघ ठरले; भारताच्या ग्रुपमध्ये आले हे दोन संघ, ६ नोव्हेंबर रोजी मॅच पाहा कोणाविरुद्ध होणार

पुण्यातील कोंढवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. 'बबन्या' नावाच्या घोड्याची वाजतगाजत मिरवणूक काढून तो घोडा भेट म्हणून देण्यासाठी चक्क महापालिकेच्या मलनिस्सारण देखभाल व दुरुस्ती कार्यालयाच्या दारात नेऊन उभा केला.

वाचा- महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो...: इंदुरीकर महाराज

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या पावसामुळं शहरातील इतर काही भागांपप्रमाणे कोंढव्यात ड्रेनेज लाइनमधून पाणी वाहत आहे. पालिका प्रशासनाकडून मात्र याच्या कडे दुर्लक्ष करत आहे. या ड्रेनेजची दुरुस्ती केली जात नसल्यानं पुणेकरांना ऐन दिवाळीत याचा त्रास सहन करावा लागतोय. पालिका प्रशासनाकडून कासावगतीने सुरू असलेलं हे काम घोड्याच्या गतीनं व्हावं यासाठी मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली बबन्या नावाच्या घोड्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर तो घोडा पालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी त्याला महापालिकेच्या मलनिस्सारण देखभाल व दुरुस्ती कार्यालयाच्या दारात नेऊन उभं केलं.

महत्वाचे लेख