अ‍ॅपशहर

'...तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता'; भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंना भावना अनावर

रविंद्र मोरे यांच्या अकाली निधनाचा मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी फेसबुकवर भावनिक फेसबुक पोस्ट लिहीत श्रद्धांजली वाहिली आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2022, 2:41 pm
पुणे : पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांचे चुलत बंधू रविंद्र गणपत मोरे यांचं सोमवारी निधन झालं. रविंद्र मोरे यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. भावाच्या अकाली निधनाचा वसंत मोरे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहीत रविंद्र मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vasant more brother
वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट


'मला जेव्हा काल सकाळी तुझ्या पोराने तात्या शेतावर काहीतरी झालंय असं सांगितलं, तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता. मी गाडीतील मित्रांना बोललो देखील होतो की त्याला मला काहीतरी सांगायचं होतं, पण गर्दीमुळे आणि प्रेसमुळे तो कदाचित बोलला नसेल. तो सारा अंदाज तुझी चिट्ठी मिळताच पहिल्या वाक्यातच आला आणि नक्की कोण चुकलं तेच कळेना,' अशी हतबलता वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

चिंता वाढली! राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवली

'जो तात्या रोज हजारो लोकांचे प्रश्न चुटकी सरशी सोडवतो त्याने...'

रविंद्र मोरे यांनी कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमधून स्पष्ट झालं आहे. शेवटच्या क्षणी आपल्या भावाला मदत करू न शकल्याचं शल्य वसंत मोरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मांडलं आहे. 'ते तुझं वाक्य...तात्या मला माफ कर लय बोलायचं होते रे, पण काय करू बोलता येत नाय...बाकी खाली लिहलेले तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे, जो तात्या रोज हजारो लोकांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवतो त्याने तुझे प्रश्न नसते का रे सोडावले रवी? अरे रोज आपल्या ऑफिसच्या दारातील गर्दीतून रस्ता काढत जात होतास ना? मग मी तुला त्याही गर्दीत रस्ता दाखवला नसता का रे रवी?' असं मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



दरम्यान, आत्महत्या हा कधीच अडचणींवरील मार्ग होऊ शकत नाही. यातून जनतेने एक मात्र नक्की घ्यावे की आपण बोललं पाहिजे, असं आवाहनही वसंत मोरे यांनी केलं आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज