अ‍ॅपशहर

महागाईविरोधात मनसेची निदर्शने

केंद्र आणि राज्य सरकारच्या ढिम्म कारभारामुळे महागाईचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला असून, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी निदर्शने केली.

Maharashtra Times 18 Jun 2016, 3:00 am
पुणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या ढिम्म कारभारामुळे महागाईचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला असून, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी निदर्शने केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची मागणी मनसेने केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns protest against inflation in pune
महागाईविरोधात मनसेची निदर्शने


पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये दर १५ दिवसांनी वाढ होत असल्याने आगामी काळातही महागाई आटोक्यात राहील, याची कोणतीही शक्यता नसून, सरकार व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच कार्यरत असल्याचा आरोप मनसेने केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याने साठेबाजांना नफेखोरी करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये, सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याने बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे व हेमंत संभूस, विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, महिला सेनेच्या अर्चना शहा आणि मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज