अ‍ॅपशहर

पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा डाव

समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा महापालिका आयुक्तांचा डाव असून, त्यांच्या या हुकूमशाही विरोधात मनसे स्टाइलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.

Maharashtra Times 27 Aug 2016, 4:36 am
मनसे स्टाइलने आंदोलनाचा आयुक्तांना इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns taken objection over water meter
पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा डाव


म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा महापालिका आयुक्तांचा डाव असून, त्यांच्या या हुकूमशाही विरोधात मनसे स्टाइलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यापूर्वीच आयुक्त घरोघरी मीटर लावून, उलट्या दिशेने प्रवास करत असल्याची टीका मनसेने केली.
शहरात घरोघरी वॉटर मीटर बसविण्यात येणार असून, सुमारे सव्वातीन लाख मीटर मोफत वाटण्यात येणार आहेत. त्यासाठी, पालिकेवर सुमारे पाचशे कोटी रुपयांहून अधिक भुर्दंड पडणार आहे. वॉटर मीटरचा घाट केवळ खासगी कंपन्यांच्या हितासाठी घातला जात असून, त्यातून पुणेकरांवरचा बोजा वाढणार असल्याची टीका शिंदे यांनी केली. स्मार्ट सिटीपाठोपाठ मीटरबाबतही आयुक्त मनमानी पद्धतीने कारभार करत असून, कोणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘महापालिकेच्या कर्तव्यांमध्ये पाणीपुरवठा हे मूलभूत सेवा असली, तरी आता त्याच्याही खासगीकरणासाठी आटापिटा सुरू असून, पाणी मीटरमुळे पुणेकरांना वेठीस धरले जाणार आहे. मीटरबाबत हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जाणार असतील, तर मनसे स्टाइलने त्यांची ही पद्धत मोडून काढण्यात येईल,’ असा इशाराही शिंदे यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज