अ‍ॅपशहर

मान्सूनची जलदगती; सिंधुदुर्गात दाखल

नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) शनिवारी सिंधुदुर्गसह दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाल्याने येत्या दोन दिवसांमध्ये तो पुण्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 6 Jun 2021, 1:03 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणेः नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) शनिवारी सिंधुदुर्गसह दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाल्याने येत्या दोन दिवसांमध्ये तो पुण्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. केरळ ते कोकण दरम्यानच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात चक्रवात तयार झाल्याने नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास अपेक्षेपेक्षा जलदगतीने होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी पुणे शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai rain


हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मान्सून शनिवारी महाराष्ट्राच्या दक्षिणेत म्हणजेच सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दाखल झाला. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनने जलदगतीने प्रवास केला असून, गोवा कर्नाटक आणि आता महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून मध्य महाराष्ट्रातही दाखल होईल आणि पुण्यात पावसाचे आगमन होईल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल, असेही भाकीत हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.

कोकण ते केरळदरम्यानच्या परिसरात मान्सूनच्या प्रवासासाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा पुढे सरकण्याचा वेग वाढला असून, यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड परिसरात मान्सूनचे जोरदार आगमन होईल, असे सांगण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मान्सूनसंदर्भातील या वृत्तामुळे जिल्ह्यातील शेतीच्या कामांना वेग आला असल्याचे चित्र आहे.

- शनिवारी दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल.

- सातारा, कोल्हापूर, सांगली, कोकणासह सोलापूरात पावसाची हजेरी.

- दोन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात दाखल होण्याचा अंदाज.

- कोकण ते केरळ दरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सूनची गती वाढली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज