अ‍ॅपशहर

मान्सून राज्यात २ ते ३ जूनला दाखल होणार

येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून राज्यातही २ ते ३ जून दरम्यान पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये पाऊस येण्यासाठीचे पुरक असे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता उद्याच (३० मे) मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

Maharashtra Times 29 May 2017, 4:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त। पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon is likely to reach in maharashtra on 2 or 3 june predicts weather department
मान्सून राज्यात २ ते ३ जूनला दाखल होणार


येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होत राज्यातही २ ते ३ जून दरम्यान पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये पाऊस येण्यासाठीचे पुरक असे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता उद्याच (३० मे) मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

पुढील २४ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटे, केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडी अशा भागांमध्ये मान्सूनची वाटचाल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तीन दिवसांपूर्वी मान्सून श्रीलंकेत दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून केरळमार्गे देशात आणि राज्यात दाखल होत आहे. दरम्यान वातावरणातील बदलाची चाहूल बळीराजाला लागली असून शेतीच्या कामाची लगबगही ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज