अ‍ॅपशहर

आई गेली परीक्षेला; महिला पोलिसांनी चार महिन्यांच्या बाळाला दिली मायेची ऊब; हृदयस्पर्शी Video

Pune News: पोलिस खात्यातील नोकरी म्हटले की, प्रचंड काम आणि त्याचे टेन्शन देखील असते. अशात पुण्यातील एका परीक्षा केंद्रावरील हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे.

| Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 12:37 pm
पुणे: सध्या पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी दुपारी विधी अधिकारीपदासाठी रामटेकडी येथील एका केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला अनेक विवाहित महिला देखील परीक्षेसाठी बसल्या होत्या. तसेच काही गरोदर महिलासोबत काही महिला लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या. तसेच अनेक महिलांचे नातेवाईक देखील सोबत आले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police and baby


पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या रामटेकडी परिसरातील परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाचा- अजिंक्य रहाणे झाला 'बाप'माणूस, दसऱ्या दिवशी सोशल मीडियावरून दिली गोड...

परीक्षा केंद्रावर दुपारी आपले चार महिन्यांचे बाळ घेऊन परीक्षा केंद्रावर आले होते. केंद्रात परीक्षा देणाऱ्यांशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता. त्यात परीक्षा केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात सावलीत बसण्यासाठी झाड देखील नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीत बाळाला घेऊन कुठे बसायचे हा प्रश्न बाळाच्या वडीलांसमोर होता. काही वेळानंतर सुरक्षा रक्षकाने बाळाला घेऊन केंद्राच्या जवळच्या परिसरात बाळाला घेऊन बसण्यास सांगितले.

वाचा- दसरा मेळावा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिस आयुक्तांना का फोन लावला

मात्र, बाळ रडायला लागले. ते वडिलांना देखील त्याच रडू थांबवता येइना, तेव्हा परीक्षा केंद्रावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन त्याच्यासोबत खेळले. त्याच्या आईची परीक्षा संपेपर्यंत त्या बाळाला मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर असताना महिला पोलिसांनी माणुसकी जपत त्या बाळाला सांभाळ केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज