अ‍ॅपशहर

उसने दिलेले पैसे न दिल्याने खून

उसने दिलेले पैसे परत न दिल्याने आणि लहान भावाला मारहाण केल्याच्या रागातून कोंढव्यात एकाचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने दोन आरोपींना अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 28 Jun 2019, 6:49 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder


उसने दिलेले पैसे परत न दिल्याने आणि लहान भावाला मारहाण केल्याच्या रागातून कोंढव्यात एकाचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने दोन आरोपींना अटक केली आहे.

शाहरूख नुरहसन खान याचा २५ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खून झाला होता. शाहरूख आणि त्याचे मित्र शिवनेरीनगर कोंढवा खुर्द येथील गव्हाणे क्रीडांगणाच्या पलीकडे पारसी मैदानात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी आरोपी सोन्या उर्फ महेश मिसाळ आणि त्याच्या साथीदाराने त्या ठिकाणी येऊन कोयत्याने आणि सिमेंटची विट व गट्टूने शाहरूखला ठार मारले. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हा संवेदनशील असल्याने गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून करण्यात येत होता. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरून सापळा रचून आरोपींना अटक केली. प्रथम महेश मिसाळ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता, मिसाळने यापूर्वी मृत शाहरूख यास दिलेले पैसे परत दिले नव्हते. तसेच, शाहरूखने मिसाळच्या लहान भावास मारहाण केली होती. त्या कारणावरून चिडून मिसाळने साथीदारांसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

उपनिरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, राजकुमार केंद्रे, सहायक उपनिरीक्षक किशोर शिंदे, संतोष क्षीरसागर, मेहबूब मोकाशी, दत्तात्रय गरूड, राहुल घाडगे, गजानन गाणबोटे, संदीप राठोड, अतुल साठे, कल्पेश बनसोडे, सुजित पवार यांनी ही कारवाई केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज