अ‍ॅपशहर

मी अध्यक्ष होतो आणि नरेंद्र मोदी बैठकीला यायचे; क्रिकेटमधील राजकारणावर पवारांची रोखठोक भूमिका

Mca Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधांवरून टीका केली जात असून या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Authored byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2022, 11:58 am
बारामती : सर्वपक्षीय आघाडीमुळे यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक राज्यभर गाजली. क्रिकेटर संदीप पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर या नेतेमंडळींनी ताकद लावली होती. त्यामुळे क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधांवरून टीका केली जात असून या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad pawar narendra modi 1
शरद पवार - नरेंद्र मोदी


'जे लोक राजकारण करत आहेत त्यांचं ते अज्ञान आहे. काही ठिकाणं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे प्रतिनिधी होते. ते माझ्या बैठकांना हजर असत. दिल्लीचे अरूण जेटली होते, अनुराग ठाकूर हे हिमाचलचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे आहे, बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही,' असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा रामदास आठवले होईल, शिंदे गटातील नेत्यानेच अंदाज वर्तवल्याचा 'सामना'चा दावा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेचं आयोजन केलं असून मागील काही दिवसांपासून ते या पदयात्रेत चालत आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर यामध्ये काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत. याबाबत स्वत: शरद पवार यांनी माहिती दिली. 'भारत जोडोच्या माध्यमातून समाजात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आम्ही काही पक्षाचे लोक त्याठिकाणी एकदा जाणार आहोत,' असं पवार यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटातील मंत्री आणि आमदारामध्येच जुंपली, मुख्यमंत्र्यांवर हस्तक्षेप करण्याची वेळ!

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरही भाष्य केलं. 'कुणी शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी जात असेल तर कशाला शंका घ्यायची? केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करावी आणि त्यातून जर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे,' अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

महत्वाचे लेख