अ‍ॅपशहर

Supriya Sule: 'शिंदे सरकार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजार रुपयांची दाढी करतंय'

Supriya Sule Criticizes Eknath Shinde Government : राज्यात राजकीय सत्तांतरण झाल्यानंतर आता विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं नाही असं सांगत सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर खरमरीत टीका केली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jul 2022, 1:46 pm
पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेचे ४० आमदार फोडत महाविकास आघाडीला असा काही धक्का दिला आहे की त्यातून प्रचंड राजकीय उलथापालथ होत थेट सत्तांतरणच झालं. त्यामुळे या शिंदे-फडणवीसांच्या नवीन सारकरवर आता विरोधक सडकून टीका करत आहेत. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Shinde Government


"शिंदे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार नाही विमानाने फिरतेय, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजार रुपयांची दाढी करतंय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. सुप्रिया सुळे या काल पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

चिमुकल्याचा मृतदेह मांडीवर घेऊन रस्त्यावर बसला ८ वर्षांचा भाऊ, VIDEO पाहून मन सुन्न होईल...
"मी विठ्ठलाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी आले आहे. हे सरकार अस्थिर आहे हे अजितदादा म्हणतोय ते खरं आहे. ज्या पद्धतीने हे लोक सुरत, गुवाहटी, गोवा भारत दर्शन करून आले. ज्या रीतीने आपल्या आमदारांना बाहेर राज्यातील पोलीस हाताळत होते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे जे काही होतंय ते महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी हिताचं नाहीये," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मित्र पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला शेवपर्यंत साथ दिली आहे आणि यापुढेही देत राहणार. शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण हे बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच ठरवलं होतं आणि बाळासाहेबांच्या आदेशाच्या वेगळं काही करणं हे बाळासाहेबांना दुखावण्याचं काम आहे, असं म्हणत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.

Electricity Bill Hike : महावितरणाकडून नागरिकांना शॉक, महिन्याचे बिल 'इतक्या' रुपयांनी वाढणार
सरकार एका विमानातून उतरतंय आणि दुसऱ्या विमानात बसतंय. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजार रुपयांची दाढी करतंय, अडीच हजार रुपयाची कटिंग करतंय. यातून सामान्य कष्टकरी आणि शेतकरी भरडतोय. हे आत्ताच सरकार सत्ता आणि पैशाच्या जीवावर आलेल आहे. या सरकारला सर्वसामान्य माणसांच काहीही प्रेम नाही, हे अस्ववेदनशील शिंदे सरकार आहे, असा घणाघाती टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख