अ‍ॅपशहर

बोगद्याच्या कामासाठी एकूण तीनशे कामगार

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावर तीनशे कामगार काम करीत असून, जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या मदतीने काम सुरू आहे.

Maharashtra Times 21 Nov 2017, 4:00 am
इंदापूर : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावर तीनशे कामगार काम करीत असून, जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या मदतीने काम सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neera bhima tunnel works in daund
बोगद्याच्या कामासाठी एकूण तीनशे कामगार

नीरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांतील शेतीला अथवा लोकांना या पाण्याचा उपयोग करून देण्यासाठी या जोड बोगदा प्रकल्पाचे काम सुरू आहे. २०१२मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते.
सोमवारी अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि भिगवण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भानुदास पवार, पोलिस उपअधीक्षक अश्विनी केदार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कामगारांचे मृतदेह वर काढण्याचे काम सुरू होते; ही बातमी समजताच अकोले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी भिगवण पोलिस तपास करत आहेत.

या प्रकाराला कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. मृतांच्या नातेवाइकांना शासकीय नियमानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल.
डॉ. संदीप पाखले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमा एंटरप्रायजेस या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना मदत देण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करू.
दत्तात्रय भरणे, आमदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज