अ‍ॅपशहर

नगर रस्त्यावर वीज खंडित

थेऊर उपकेंद्रातून अतिउच्च दाबाने खराडी उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने संपूर्ण नगर रस्ता परिसर, येरवडा, विश्रांतवाडी आणि धानोरी भागात बुधवारी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अखेर दोन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

Maharashtra Times 13 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no electricity on nagar road
नगर रस्त्यावर वीज खंडित


थेऊर उपकेंद्रातून अतिउच्च दाबाने खराडी उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने संपूर्ण नगर रस्ता परिसर, येरवडा, विश्रांतवाडी आणि धानोरी भागात बुधवारी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अखेर दोन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ‘महापारेषण’कडून महावितरणला वीज पुरवठा होणाऱ्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाची वीज वहिनी बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ‘ट्रिप’ झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. थेऊर उपकेंद्रातूनच खराडी उपकेंद्राला वीजपुरवठा बंद झाल्याने खराडी, चंदननगर, वडगांव शेरी, विमाननगर, कल्यानीनगर हा संपूर्ण नगर रस्ता, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी लोहगांव आणि कळस भागातील वीज गेली होती.

‘महापारेषण’कडून तातडीने लोणीकंद उपकेंद्रावर जाऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी वीज पुरवठा सुरळीत झाला. येरवडा ते खराडी बायपासपर्यंत सगळीकडे वीज खंडित झाल्याने बँकाचे दैनंदिन व्यवहार, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने यांना त्रास सहन करावा लागला. तर उपनगरातील सर्व चौकात सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात वीज गेल्याने आणखी भर पडली. अखेर दुपारी बारा वाजता वीज आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


‘तांत्रिक बिघाडामुळे वीज नाही’

महापारेषण केंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या अतिउच्च वीज वहिनी अचानक ‘ट्रिप’ झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन दीड तासानंतर दुपारी बारा वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

- पी. आर. गायकवाड, उपकार्यकरी अभियंता, महापारेषण, पुणे विभाग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज