अ‍ॅपशहर

'त्या' कंपनीचे ऑफिस पोलिसांकडून सील

कल्याणीनगर येथील कुमार सेरिब्रम ‘आयटी पार्क’मध्ये पी. सी. टेक्नोलॉजी या बनावट कंपनीचे ऑफिस पोलिसांनी मंगळवारी सील केले. या कंपनीने पुणे-ठाण्यासह नऊशे इंजिनीअरची सुमारे अकरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या ऑफिसमधील कम्प्युटरच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत; तसेच कंपनीचे विविध बँकातील खाते गोठवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

Maharashtra Times 24 Aug 2016, 10:59 am
म. टा. प्रतिनिधी ,येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम office seal
'त्या' कंपनीचे ऑफिस पोलिसांकडून सील

कल्याणीनगर येथील कुमार सेरिब्रम ‘आयटी पार्क’मध्ये पी. सी. टेक्नोलॉजी या बनावट कंपनीचे ऑफिस पोलिसांनी मंगळवारी सील केले. या कंपनीने पुणे-ठाण्यासह नऊशे इंजिनीअरची सुमारे अकरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या ऑफिसमधील कम्प्युटरच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत; तसेच कंपनीचे विविध बँकातील खाते गोठवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे आणि ठाण्यातील ‘आयटी पार्क’मध्ये असलेल्या पी. सी. टेक्नोलॉजी या बनावट कंपनीने आपले अलिशान ऑफिस थाटून जवळपास ९०० सॉफ्टवेअर इंजिनीअरची ११ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. कल्याणीनगर भागातील या कंपनीने पुणे परिसरातील सुमारे तीनशे इंजिनीअरची ७५ लाख रुपयांची फसवणूक करून पोबारा केला. अन्वर युनूस खान (वय २४, रा. वाकड ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कुमार सेरिब्रम ‘आयटी पार्क’मध्ये कंपनीच्या ऑफिसमधील भाड्याने वापरात असलेले कम्प्युटरमधील हार्ड डिस्क पोलिसांनी मंगळवारी जप्त केले. इमारतीत भाडे तत्वावर घेतलेले ऑफिसदेखील सील करण्यात आले. कंपनीने विविध बँकांमध्ये उघडलेले खाते ‘सील ‘करण्यासाठी पोलिसांनी सबंधित बँकांना पत्रे पाठविले असल्याचे गुन्हे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले .

येरवडा पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळपासून फसवणूक झालेल्या इंजिनीअरचे जबाब घेणे चालू होते. इमारतीतील जागा भाड्याने देण्यापूर्वी जागा मालकांनी कंपनीकडून कागदपत्रांची खातरजमा केली होती का, याचीही तपास करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज