अ‍ॅपशहर

‘कॅप’च्या तीनच फेऱ्या होणार

राज्यात इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्या होणार आहेत. यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांसाठी ‘कॅप’च्या चार फेऱ्या झाल्या होत्या. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, आवडीच्या कॉलेजात प्रवेश मिळणे सोयीचे होणार आहे.

Maharashtra Times 27 Apr 2017, 4:27 am
नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी; विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम only three rounds for cap in maharashtra
‘कॅप’च्या तीनच फेऱ्या होणार


म. टा. प्रतिनिधी, पुणे


राज्यात इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्या होणार आहेत. यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांसाठी ‘कॅप’च्या चार फेऱ्या झाल्या होत्या. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, आवडीच्या कॉलेजात प्रवेश मिळणे सोयीचे होणार आहे.

अशी माहिती तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात काही वर्षांपूर्वी इंजिनीअरिंगच्या डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यातच इंजिनीअरिंगला प्रवेश न मिळालेले किंवा बारावीला अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दहावीच्या गुणांवर डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत होते. त्यामुळे राज्यात इंजिनीअरिंग डिग्रीसोबतच डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठीच्या कॉलेजांमध्येही मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित नोकऱ्या मिळत नसल्याने इंजिनीअरिंगच्या डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी प्रवेश प्रक्रिया राबवताना सरकारने दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी चार फेऱ्यांऐवजी तीनच फेऱ्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होण्याची आणि प्रवेश प्रक्रिया कमी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रेवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्यानंतर कॉलजांमध्ये अनेक जागा रिक्त राहत असल्याचे प्रकार घडत होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने जागांची भरती सक्षम प्राधिकाऱ्याच्यामार्फत कम्प्युटर प्रणालीद्वारे एकत्रितपणे सामायिक प्रवेश पद्धतीद्वारे करणार असल्याचे जाहीर केले. याबाबत सविस्तर माहिती कॅप फेऱ्यांसोबत जाहीर करण्यात येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज