पंचांग
बुधवार, १५ मे २०१९
शालिवाहन शके १९४१
वैशाख शु. एकादशी १०.३६ पर्यंत, चंद्र नक्षत्र : उत्तरा ७.१६ पर्यंत, योग : वज्र, करण : बव, चंद्रराशी : कन्या, सूर्य नक्षत्र : कृत्तिका, सूर्योदय : सकाळी ६.०६, सूर्यास्त : सायं. ७.०५, चंद्रोदय : दु. ३.४१, चंद्रास्त : रात्री ३.५९
राशिभविष्य
मेष : अत्यंत चांगले ग्रहमान. लाभाची गणिते राहतील. चोहीकडून सहकार्य मिळेल.
वृषभ : वर्तमानातील आनंद प्राप्त होईल. प्रगतीची चाहूल लागेल. वैद्यकीय चिकित्सा करा.
मिथुन : कलावंतांना लाभ होतील. पुरस्कारासाठी मानांकन शक्य. अतिताण टाळा.
कर्क : व्यावसायिक फायद्याची गणिते होतील. प्रिय व्यक्ती भेटतील. दुपारनंतर लाभ.
सिंह : आर्थिक स्रोत सापडेल. विखारी टीका टाळा. दोषदर्शन १०० टक्के नको.
कन्या : कौटुंबिक सहकार्य राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कष्ट सार्थकी लागतील.
तूळ : खेळातून इजा शक्य. वाहने जपून चालवा. नवीन योजनांना गती मिळेल.
वृश्चिक : बाजू लावून धरावी लागेल. कार्य नावारूपाला येईल. कलांमध्ये रमाल.
धनु : नोकरीत पगारवाढ शक्य. विचित्र मनोवृत्ती राहील. साहस नकोच.
मकर : सकाळ विनाकारण ताणाची. व्हिसा कामे रखडणे शक्य. प्रकृती सांभाळा.
कुंभ : संध्याकाळी शुभवार्ता मिळतील. तरुणांना लाभ. प्रेममय आनंदी दिवस.
मीन : तगमग वाढेल. अफवांमुळे ताण वाढेल. अवास्तव त्रागा टाळा.
- पं. डॉ. संदीप अवचट
---